
Virat Kohli New Hair Style: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या मैदानातील कामगिरीसोबतच त्याच्या स्टायलिश लूकसाठीही ओळखला जातो. तो बऱ्याचदा त्याच्या लूकमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसतो. नुकताच त्याने नवी हेअर स्टाईल केली आहे.
विराट सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघासोबत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघा ५ कसोटी सामन्यांची मालिका (Border-Gavaskar Trophy) खेळत आहे. या मालितेतील तीन सामने पूर्ण झाले आहेत, तर दोन सामने अद्याप खेळायचे आहेत.