Virat Kohli transfers his Gurugram property rights to brother Vikas
esakal
Virat Kohli Transfers Property Rights To Brother Vikas Kohli: भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली हा लंडनला शिफ्ट होतोय, अशी शक्यता आता आणखी बळावली आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना विराट त्याची पत्नी अनुष्का व दोन मुलांसह लंडनमध्येच असतो. आताही तो आयपीएल २०२५ नंतर १४ ऑक्टोबरला भारतात आला आणि १५ तारखेला टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. या एका दिवसात त्याने त्याची गुरुग्राम येथील संपत्ती मोठा भाऊ विकास कोहली याच्या नावावर केली आहे.