
विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांची मैत्री कोणापासून लपून राहिलेली नाही. ३ जून रोजी आयपीएल २०२५ अंतिम सामन्यावेळीही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरही त्यांच्यातील मैत्री सर्वांना दिसली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकल्यानंतर दोघांनीही कडाडून मिठी मारली होती. यावेळी दोघेही भावनिक झाले होते. दरम्यान, असे असलं तरी त्याआधी काही महिन्यांपूर्वी विराट एबी डिविलियर्सशी बोलत नव्हता. याबाबत आता डिविलियर्सनेच खुलासा केला आहे.