
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाठिंबा देण्यासाठी भारतात आला होता. डिविलियर्स या संघासाठी १० वर्षे खेळला. या १० वर्षात त्याने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्यामुळे त्याला आजही आरसीबीचा खेळाडू म्हणून ओळखलं जातं.
पण डिविलियर्सने आयपीएलची सुरुवात आरसीबी संघातून केली नव्हती. तो सुरुवातीचे तीन हंगाम दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीचे दिल्ली डेअरडेविल्स) संघाकडून खेळले होते. पण २०११ आधी त्याला दिल्लीने करारमुक्त केले आणि आरबीसीने त्याला खरेदी केले.