
IPL 2025 News: इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलाव नुकताच जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात सर्वच फ्रँचायझींनी आपली संघबांधणी केल्याचे दिसले. मेगा लिलाव झाल्याने बऱ्याच संघात मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. यातीलच एक संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.
बंगळुरू संघाचे आगामी आयपीएल हंगामात कोण नेतृत्व करणार आहे, याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की विराट कोहली कदाचीत आयपीएल २०२५ मध्ये बंगळुरू संघाचे नेतृत्व करेल.