Virat Kohli Deepfake Video : सचिननंतर आता किंग कोहलीही झाला डीपफेकची शिकार; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Deepfake News : रश्मिका मानधना आणि महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आता विराट कोहलीही झाला डीपफेक व्हिडिओंचा शिकार
Virat Kohli Deepfake Video Marathi News
Virat Kohli Deepfake Video Marathi Newssakal

Virat Kohli Deepfake News : एआयमुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक महत्वपूर्ण बदल होत आहेत. पण त्याचा धोका जास्त आहे, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. कारण एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ बनवले जात आहेत, जे पूर्णपणे खोटे व्हिडिओ आहेत. भारतात रश्मिका मानधना आणि महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आता विराट कोहलीही डीपफेक व्हिडिओंचा शिकार झाला आहे.

Virat Kohli Deepfake Video Marathi News
Mayank Agarwal : 'आता अजिबात रिस्क नको...' विमानातील 'त्या' घटनेनंतर अग्रवालने उचलले हे पाऊल, फोटो होतोय व्हायरल

विराट कोहलीचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका बेटिंग ॲपची जाहिरात करताना दिसत आहे. सायबर गुन्हेगारांनी एक व्हिडिओ तयार करण्यासाठी AI आधारित डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामध्ये असे दिसते की, विराट कोहली त्या बेटिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार करत आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ बनवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी हा व्हिडिओ देशातील एका हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या न्यूज शोचा भाग बनवला आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला हिंदी न्यूज चॅनलवरील अँकर बेटिंग प्लॅटफॉर्मबद्दल बोलू लागतो आणि त्यानंतर विराट कोहलीचा व्हिडिओ सुरू होतो. याचा अर्थ सायबर गुन्हेगारांनी विराट कोहली आणि न्यूज अँकर या दोघांचे डीपफेक व्हिडिओ तयार करून प्रमोशनल व्हिडिओ तयार केला आहे.

बनावट व्हिडिओ कसे ओळखायचे?

विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सचिन पैसे कमावण्याच्या प्लॅटफॉर्मला प्रमोट करताना दिसला होता. पण त्यानंतर सचिनने स्वतः त्याचा डीपफेक व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. हा बनावट व्हिडिओ असल्याची माहिती देण्यात आली.

असे बनावट व्हिडीओ तुम्हाला प्रथमदर्शनी खरे वाटू शकतात, पण जर तुम्ही ते पुन्हा-पुन्हा काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला समजेल की त्या व्हिडिओमध्ये काहीतरी गडबड आहे. डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या अभिव्यक्तींचे वारंवार निरीक्षण करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com