
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने गेल्या आठवड्यात १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर अनेकांनी त्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते.
भारताला जून महिन्यात ५ कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यातून भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील मोहिमेला सुरूवात करणार आहेत. पण त्याआधीच विराटने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
पण असे असले तरी विराट इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसू शकतो, कारण इंग्लंडमधील कौऊंटी संघ मिडलसेक्सने त्याच्याशी करार करण्याची तयारी दाखवली आहे.