
Virat Kohli Updates: भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने भारतीय संघाला सलग दोन कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव स्विकारल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंसाठी करण्यात आलेले नवे नियम गुरुवारी (१६ जानेवारी) जाहीर करण्यात आले.
त्यानुसार आता भारतीय संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरायचे असेल, तर खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्येही सक्रिय रहावेच लागणार आहे. अगदीच काही समस्या असेल, तर निवड समिती अध्यक्ष्यांच्या परवानगीने तो खेळाडू देशांतर्गत सामन्यांसाठी अनुपलब्ध राहू शकतो.
अशात आता बरेच वरिष्ठ खेळाडू रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार आहेत. रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे.