
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला. या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच असे रिपोर्ट्स समोर आले की भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहली देखील कसोटीतून निवृत्तीचा विचार करत आहे. तसं त्याने बीसीसीआयला कळवलं आहे.
विराट कसोटीमधील एक चांगला खेळा़डू मानला जातो. असं असताना तो निवृत्तीचा विचार करत असल्याचे वृत्त समोर येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्याला कसोटी क्रिकेट खेळत राहण्याचा सल्ला दिला आहे.