होऊन जाऊ दे...! विराट कोहली, RCB च्या सर्व खेळाडूंना भारतीय हॉकी संघानं दिलं आव्हान; Yo-Yo Test साठी समोरासमोर येणार

Indian hockey team vs RCB fitness competition latest news: भारतीय हॉकी संघाचा अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याने विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंना भन्नाट फिटनेस चॅलेंज दिले आहे.
Virat Kohli and RCB Yo-Yo Test challenge by Indian hockey team

Virat Kohli and RCB Yo-Yo Test challenge by Indian hockey team

esakal

Updated on

Virat Kohli and RCB Yo-Yo Test challenge by Indian hockey team: भारतीय हॉकी संघाचा स्टार खेळाडू मनप्रीत सिंग याने भारताचा सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू विराट कोहली आणि संपूर्ण RCB संघाला एका सराव सत्रात सामील होण्याचे आवाहन केले आहे. या सत्रात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळून कोणता संघ अधिक तंदुरुस्त आहे हे सिद्ध करतील. विराट आपली तंदुरुस्ती जपण्यासाठी ओळखला जातो आणि तो सर्वात तंदुरुस्त भारतीय क्रिकेटपटू आहे. BCCI ने सेट केलेल्या १६.५ च्या गुणांसह विराट Yo-Yo Test मध्ये २१.६ गुणांसह सर्वोत्तम ठरला आहे. विराट जेव्हा कर्णधार होता, तेव्हा ही चाचणी बीसीसीआयने अनिवार्य केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com