
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची मैदानावरील उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. त्याची मैदानातील आक्रमकता, तर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेतील विषय ठरला आहे.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने युवा सॅम कॉन्स्टासला खांदा मारला होता. तसेच सँडपेपर प्रकरणाची आठवणही त्याने प्रेक्षकांना करून दिली होती. तरी गेल्या काही वर्षात त्याची आक्रमकता बरीच कमी झाल्याचे दिसले आहे. त्यामुळेही कधीकधी त्याच्यावर टीका होते. आता याबद्दल स्वत: विराटनेच प्रतिक्रिया दिली आहे.