
भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहली हा जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या पहिल्या तीन खेळाडूंमध्ये आहे. सहाजिकच त्याच्याकडे अनेक ब्रँड्सच्या जाहिराती आहेत.
या जाहिरातींमधून तो कोट्यवधी रुपये कमावतो. त्याच्या स्वत:चाही One8 ब्रँड आहे. त्यामुळे या ब्रँड्सच्या जाहिरातींच्या पोस्टही त्याने अनेकदा इंस्टाग्राम अकाऊंटवर केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात तर त्याने त्याच्या अकाऊंटवर फक्त जाहिरातींचेच पोस्ट केल्या होत्या.