Virat Kohli and Rohit Sharma are playing Vijay Hazare Trophy as per BCCI mandate
esakal
Virat Kohli and Rohit Sharma had played domestic cricket : विराट कोहली व रोहित शर्मा या सीनियर्सचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत सुसंवाद नाही. ही दोघं गौतमला जेवढं टाळता येईल, तेवढं टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामागे कारणही तसेच आहे. गौतमचा युवा खेळाडूंवर जास्त भर आहे आणि त्यामुळेच विराट व रोहितला कसोटीतून निवृत्ती घेण्यास भाग पाडले गेले. आता विराट व रोहित २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत, परंतु BCCI ने त्यांच्यासमोर अटी व शर्ती ठेवल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता होती. पण, अखेर विराट व रोहितने त्या मान्य केल्या आणि मोठा निर्णय घेतला.