

Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
भारतीय वनडे संघात सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. ते आता त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असून दोघांसाठीही २०२७ वनडे वर्ल्ड कप अखेरची स्पर्धा असेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांच्या भवितव्याबाबत सातत्याने चर्चा होत असते.
विराट आणि रोहित (Virat Kohli & Rohit Sharma) यांनी यापूर्वीच कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ वनडे प्रकारात सक्रिय आहेत.