
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्याकडे झुकत आहे. या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी (२ मार्च) दुबईमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळवला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी जरी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला असला, तरी अ गटात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी दोन्ही संघात चुरस असणार आहे. तसेच हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खास असणार आहे. विराट फॉर्ममध्ये परतला असल्याने त्याच्या खेळण्याकडेही सर्वांचे लक्ष्य असणार आहे.