
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचे सर्वात दिग्गज आणि स्टार खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. जवळपास १५ वर्षांपासून ते दोघेही एकत्र भारतासाठी खेळत आहे. साधारण एकाचवेळी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवातही झाली. त्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी एकमेकांसोबत सर्वाधिक क्रिकेटही खेळले आहे आणि अनेक अविस्मरणीय भागीदाऱ्याही केल्या आहेत.
विराट आणि रोहित यांनी गेल्या वर्षभरात भारतासाठी एकत्र टी२० वर्ल्ड कप २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली. दरम्यान, अनेक वर्षे एकत्र खेळत असताना अनेकदा त्यांच्यात मदभेद असल्याच्या अफवाही पसरल्या, ज्यावर वेळोवेळी त्यांनी नकार दिला. त्यामुळे अनेकदा त्यांच्यातील नात्याबद्दल चर्चा झाली आहे.