

Virat Kohli Viral Video
Sakal
भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धही रविवारी (११ जानेवारी) सुरू झालेल्या वनडे मालिकेची सुरुवातही त्याने दणक्यात केली आहे. त्याने वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला ४ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.