
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून सोमवारी (१२ मे) निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या निवृत्तीच्या निर्णय सर्वांना सांगितला. विराटने १४ वर्षांचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास थांबवत असल्याचे सांगितले.
त्याने हा निर्णय सांगितल्यानंतर लगेचच तो दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशमधील वृंदावनला आलेला दिसला आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.