

Virat Kohli | India vs New Zealand
Sakal
Virat Kohli Complete 28000 International Runs: भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (११ जानेवारी) खेळवला जात आहे. वडोदरा येथे होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम केला आहे.
विराटने (Virat Kohli) त्याला रनमशीन का म्हणातात हे पुन्हा एकदा या सामन्यातून दाखवून दिले आहे. विराटने या सामन्यात विश्वविक्रम करताना सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यांनाही मागे टाकले आहे.