विराट कोहलीने आधीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
लंडनमधील त्याचा फोटो व्हायरल झाल्याने ODI निवृत्तीबाबत चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
विराटचा उद्देश २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळण्याचा असला तरी सध्याचे संकेत धूसर आहेत.
Will Virat Kohli retire from ODI cricket? मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहली कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत फार चांगली कामगिरी करता न आल्याने त्याने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीतूनही निवृत्ती जाहीर केली. लंडनमध्ये असलेल्या विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे.