ग्रेग चॅपेलच्या कार्यकाळात वरिष्ठ खेळाडूंशी वारंवार मतभेद होत असत.
वीरेंद्र सेहवागच्या खेळण्याच्या शैलीवरून चॅपेल व सेहवाग यांच्यात जोरदार वाद झाला.
चॅपेलने सेहवागला “पाय हलवल्याशिवाय धावा होत नाहीत” असे टोमणे मारले.
Virender Sehwag revealed a shocking fight with coach Greg Chappell : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांचा टीम इंडियासोबतचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ बराच गाजला... सौरभ गांगुलीला संघाबाहेर करण्यापासून ते इरफान पठणला गोलंदाजाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून बवण्याचे निर्णय आजही चर्चिले जातात. चॅपेल यांची कार्यशैली वादग्रस्त असली तरी त्यांनी नेहमी युवा प्रतिभेला प्रोत्साहन दिले होते आणि सीनियर खेळाडूंवर त्यांचा नेहमी राग असल्याचे दिसले. अशात वीरेंद्र सेहवाग याने चॅपेल यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला, ज्यात ही दोघं एकमेकांच्या अंगावर अक्षरशः धावून गेली होती. राहुल द्रविडने ड्रेसिंग रुममधील या वादात मधस्थी केली नसती तर प्रकरण आणखी चिघळले असते.