Aryavir Sehwag registers for IPL 2027 auction
esakal
Rahul Dravid son Anvay skips IPL 2027 auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी होणाऱ्या लिलावात वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरही उतरला आहे. १६ डिसेंबरला गोवा येथे होणाऱ्या मिनी लिलावासाठी आर्यवीरने त्याचे नाव नोंदवले आहे. भारताने नुकतेच १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत केले. या स्पर्धेत आर्यवीरला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पण, राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड हा लिलावापासून दूर राहिल आहे.