वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये (DPL) दमदार पदार्पण केले.
पदार्पणाच्या सामन्यात त्याने भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला सलग दोन चौकार खेचले.
आर्यवीरने यश धुलच्या जागी सेंट्रल दिल्ली किंग्स संघात प्रवेश केला.
Aaryavir Sehwag DPL debut batting highlights : भारतीय क्रिकेट चाहत्यांना वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक फलंदाजीने मंत्रमुग्ध केले होते. आता त्याचा मुलगा आर्यवीर तोच जोश आणि तिच आक्रमकता घेऊन मैदानावर उतरला आहे. दिल्ली प्रीमिअर लीग ( DPL ) मध्ये आयर्वीरने काल पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात त्याच्यात वीरूची झलक दिसली. २००७ मध्ये जन्मलेल्या आर्यवीरने यापूर्वी एकही ट्वेंटी-२० सामना खेळला नव्हता. त्याने सेंट्रल दिल्ली किंग्सकडून पदार्पण करताना सलामीला येताना चांगली खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजाला सलग चार चौकार खेचले.