

VVS LAXMAN
esakal
बंगळूर : भारतीय क्रिकेटपटू व त्यांच्या वाढत्या दुखापती यावरून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) यावर टीका होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर सीओईचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करताना म्हटले की, ‘‘भारतीय क्रिकेटपटूंना दुखापतीतून बरे होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर त्यासाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला दोष देता येणार नाही.