Viral cricket video: Indian coach tackled WWE-style in practice
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला लीड्स कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या शुभमन गिल अँड टीमला एडबस्टन कसोटीत विजय मिळवून इतिहास घडवायचा आहे. त्यांना नुसती मालिका बरोबरीत आणायची नाही, तर एडबस्टनवरील पराभवाची मालिका तोडायची आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडू एडबस्टन येथे नेट्समध्ये कसून सराव करताना दिसत आहेत. मात्र, अर्शदीप सिं व आकाश दीप हे गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलसोबत WWE खेळताना दिसले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.