IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

Shashank Singh dropped catches reaction video: PBKS vs LSG सामन्यात एकाच खेळाडूच्या दोन चुका चर्चेचा विषय ठरल्या. शशांक सिंग याने दोन सोपे झेल सोडल्याने मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली, तर प्रशिक्षक Ricky Ponting देखील नाराज दिसत होते.
Shashank Singh drops two easy catches in PBKS vs LSG IPL 2026 clash,

Shashank Singh drops two easy catches in PBKS vs LSG IPL 2026 clash,

Updated on

Arshdeep Singh & Ricky Ponting angry reaction IPL 2026 viral moment: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अपराजित मालिका कायम राखताना लखनौ सुपर जायंट्सवर ५४ धावांनी विजय मिळवला. PBKS च्या २५४ धावांचा पाठलाग करताना LSG ला २०० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना जिंकून आयपीएल गुणतालिकेत आपली अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. पण, या सामन्यात शशांक सिंगकडून ( Shashank Singh) झालेल्या दोन चुका नजरअंदाज करण्यासारख्या नव्हत्या. त्याने दोन सोपे झेल टाकले आणि त्यामुळे अर्शदीप सिंग व मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. त्यात सामन्यातनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) त्याच्यासोबत केलेल्या कृतीची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com