
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जरी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ पराभूत झाला. पण असे असले तरी या मालिकेवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा मोठा प्रभाव राहिला. त्याने या मालिकेत ५ सामन्यात मिळून सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या. विकेट्सच्याबाबतीत त्याच्या आसपासही कोणी नव्हते.