

Keemo Paul | India vs West Indies 4th T20I
Sakal
वेस्ट इंडिजने बुधवारी (१४ ऑक्टोबर) हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात थरारक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने हा सामना २४ धावांनी जिंकत ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता या मालिकेतील पाचवा सामना निर्णायक असेल. दरम्यान, चौथ्या सामन्यातील वेस्ट इंडिजच्या विजयात कर्णधार शे होप, शेरफेन रुदरफोर्ड्स आणि किमो पॉल यांचे मोलाचे योगदान राहिले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १९.३ षटकात सर्वबाद २२३ धावा करता आल्या. भारतासाठी सलामीवीर संजू सॅमसनने केलेलं आक्रमक अर्धशतक व्यर्थ ठरले.