

Justin Greaves Ruled Out | India vs West Indies 2nd ODI
Sakal
India vs West Indies 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पहिला वनडे सामना तिरुअनंतपुरम येथे झाला होता. या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतासाठी कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी शतके करत विजय सोपा केला.
यात सामन्यात वेस्ट इंडिजसाठी सलामीवीर जस्टिन ग्रीव्ह्जनेही शानदार शतक केले होते, ज्यामुळे वेस्ट इंडिजला २९५ धावांपर्यंत पोहचता आले होते. आता या मालिकेतील दुसरा वनडे सामना गुवाहाटी येथे ३० सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.