Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Indian Women Archers Win Gold Medal: आशियाई क्रीडा २०२६ मध्ये भारताच्या महिला कम्पाऊंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत सुवर्णपदक जिंकले. चिकिथा तनिपर्थी, प्रितिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी मिळून विश्वविक्रमाशीही बरोबरी केली.
India Women Archery Team Gold Medal | Asian Games 2026

India Women Archery Team Gold Medal | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

India Women's Compound Archery Team Aisan Games Gold Medal: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी महिला संघाने बुधवारची सुरुवात दणक्यात केली आहे. भारताच्या तिरंदाजी महिला संघाने सांघिक कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी फक्त सुवर्णवेधच केलेला नाही, तर विश्वविक्रमाशीही बरोबरी केली आहे.

भारताच्या संघात चिकिथा तनिपर्थी, प्रितिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांचा समावेश होता. या तिघींनी भारताला यंदाच्या स्पर्धेतील सातवे पदक जिंकून दिले आहे.

India Women Archery Team Gold Medal | Asian Games 2026
Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com