IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. जॉन कॅम्बेल, शे होप आणि आमीर जांगू या तिघांनीही शतके झळकावत भारतासमोर मोठे आव्हान उभे केले.
IND vs WI 2nd ODI

John Campbell Shai Hope Amir Jangoo centuries IND vs WI 2nd ODI

esakal

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News: जॉन कॅम्बेल, शे होप व आमीर जांगू यांनी भारतीय गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. या तिघांनी वैयक्तिक शतक झळकावताना भारतासमोर चारशेपार धावांचे लक्ष्य ठेवले. वेस्ट इंडिजने १९८३ मध्ये भारताविरुद्ध ८ बाद ३३३ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम आज मोडला गेला. वेस्ट इंडिजने वन डे क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडला. २०१९ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध ३८९ धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध वन डेत ४०० पार धावा करणारा तो तिसरा संघ ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com