

West Indies - Zimbabwe
Sakal
West Indies and Zimbabwe’s Return Delay: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले होते, यातील १२ संघाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपले होते. त्यानंतर सुपर-८ फेरीही पूर्ण झाली असून या फेरीनंतर झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका या चार देशांचेही आव्हान संपले आहे.
श्रीलंका मायदेशात खेळत होते, तर पाकिस्तान श्रीलंकेत होते. त्यामुळे या दोन्ही देशांचे खेळाडू घरी परतले. मात्र, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज (Zimbabwe and West Indies) या दोन्ही संघांचे आव्हान संपल्यानंतरही त्यांना भारतातच थांबावे लागणार आहे.