What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

MARCO JANSEN’S SENSATIONAL CATCH VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर काही झेल असे असतात, जे एकदा पाहून समाधान होत नाही. पुन्हा-पुन्हा पाहावेसे वाटतात. मार्को यान्सेनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतलेला अफलातून झेल असाच आहे.
Marco Jansen| SA vs AUS

Marco Jansen incredible catch against Australia

esakal

Updated on: 

WATCH: MARCO JANSEN PULLS OFF A BLINDER! TWO-FINGER CATCH : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन डे सामना दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनने गाजवला.. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. २६ वर्षाय मार्कोने अफलातून झेल घेऊन ऑसी फलंदाजाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले, तर अष्टपैलू कामगिरी करून त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) एका विक्रमाशी बरोबरी केली. आफ्रिकेच्या ८ बाद २९७ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २३० धावांवर गार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com