

Ravichandran Ashwin on Jasprit Bumrah replacement concern
esakal
R Ashwin warning about lack of young bowlers India : भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन याने टीम इंडियाच्या फलंदाजांचे कौतुक करताना भविष्यात भेडसावणारा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय फलंदाजांवर विश्वास दाखवता, हा संघ मर्यादित षटकांच्या आणखी ३-४ ट्रॉफी जिंकेल असे मत व्यक्त केले. पण, त्याने लगेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) निभावत असलेल्या भूमिकेकडे लक्ष वेधले. जसप्रीत खेळतोय तो पर्यंत ठिक आहे, परंतु त्याच्या नंतर कोण? जसप्रीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा गोलंदाजी विभाग उघडा पडेल, गोलंदाजीतील धार कमी होईल, असे मत अश्विनने व्यक्त केले. जसप्रीतमुळे आता मर्यादित षटकांतील टीम इंडियाची ही कमकुवत बाजू झाकली जात असल्याचेही तो म्हणाला.