

India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (८ मार्च) भारत आणि न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ मिळणार आहे.
हा सामना जिंकून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपचे (T20 World Cup) विजेतेपद नावावर करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे, तर न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलण्यात आतुर आहे. त्यामुळे या दोन्ही संघात रोमांचक सामना पाहायला मिळण्याची चाहत्यांना अपेक्षा असणार आहे.