Shikhar Dhawan brought girlfriend into hotel room भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'मिस्टर आयसीसी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गब्बरने 'द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर' या त्याच्या आत्मचरित्रात २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारत अ संघाच्या मालिकेदरम्यान एका मुलीबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेल्या तीव्र भावनेबद्दल खुलासा केला. रोहित शर्मासोबत तो ज्या हॉटेलच्या रुममध्ये राहत होता तिथे तो त्या मुलीला 'गपचूप' घेऊन आल्याचेही त्याने सांगितले.