When is India’s next match after T20 World Cup 2026 final
esakal
Team India full cricket schedule 2026 all formats: भारतीय संघाने रविवारी अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऐतिहासिक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला... न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवून भारताने वर्ल्ड कप उंचावला आणि आता टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार, याची आता उत्सुकता आहे. २८ मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग सुरू होणार आहे आणि त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार त्यांच्या त्यांच्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. त्यामुळे ३१ मे पर्यंत तरी भारतीय खेळाडू एकत्रित निळ्या जर्सीत दिसण्याची शक्यता नाहीच... पण, जूननंतर भारतीय संघ तगड्या प्रतिस्पर्धींना भिडायला सज्ज होणार आहे.