

Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
When Will Rohit Sharma and Virat Kohli Play Next? भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावली. रविवारी इंदोरला झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४१ धावांनी विजय मिळवला. यामुळे न्यूझीलंडने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.
न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. पण नंतरचे दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आणि पहिल्यांदाच भारतात वनडे मालिका जिंकली. चालू हंगामातील ही अखेरची वनडे मालिका होती.
यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिका २१ जानेवारीपासून सुरू होईल. त्यामुळे आता विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा खेळताना कधी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.