

Asian Games, Cricket Live Streaming
esakal
India vs Sri Lanka Asian Games Final: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ११४ धावांनी विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे भारतीय संघ आता सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
आता अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असून, अंतिम सामना जिंकून सुवर्णपदक आपल्या नावावर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हा सामना मंगळवारी (२२ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे.