Who is Ajitesh Argal? विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकून देणारा बनला अम्पायर... IPL 2026 मध्ये LSG vs RR सामन्यातून पदार्पण; बनू शकला असता टीम इंडियाचा स्टार, पण...

who is Ajitesh Argal IPL umpire story? अजितेश अरगल हे नाव अनेकांना नवीन वाटू शकते, पण एकेकाळी तो भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव होऊ शकला असता. ICC Under-19 Cricket World Cup 2008 मध्ये Virat Kohli च्या नेतृत्वाखाली भारताने जेव्हा विजेतेपद पटकावले, तेव्हा अरगल हा त्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज होता.
Ajitesh Argal Virat Kohli U19 World Cup teammate

Ajitesh Argal Virat Kohli U19 World Cup teammate

Updated on

Ajitesh Argal Virat Kohli U19 World Cup teammate: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात एक नाव अचानक चर्चेत आलं, ते म्हणजे अजितेश अरगल... २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता आणि फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच ठरणारा अजितेश आज IPL 2026 मध्ये अम्पायर म्हणून मैदानावर उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २००८ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अजितेशने शानदार कामगिरी केली होती. त्याने ५ षटकांत केवळ ७ धावा देऊन २ बळी घेतले होते. या कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com