Who is Harpreet Singh? भारताकडून वर्ल्ड कप खेळला अन् आज आपल्याचविरुद्ध ठोकले शतक; पठ्ठ्याने यूएईला सावरले, तिलक वर्माचे टेंशन वाढवले

IND A VS UAE ASIA CUP RISING STARS : भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या हरप्रीत सिंग भाटियाने आता UAE कडून खेळताना भारताविरुद्ध शतक झळकावले.
Who is Harpreet Singh Bhatia UAE cricketer?

Once an India U19 World Cup player, Harpreet Singh Bhatia is now representing UAE

esakal

Updated on: 

India A vs UAE Asia Cup Rising Stars : आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेतील यूएईविरुद्धचा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. नेपाळला २६ धावांवर गुंडाळून स्पर्धेत दणक्यात सुरूवात करणाऱ्या तिलक वर्माच्या संघाला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला मंगळवारी सुरू असलेला सामना जिंकावा लागणार आहे. पण, भारताच्या या मार्गात हरप्रीत सिंग भाटिया (Harpreet Singh Bhatia) उभा राहिला आणि त्याने खणखणीत शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले.

Loading content, please wait...