Sakshi Sawhney biography and achievements as IAS officer in Punjab
esakal
साक्षी साहनी या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी असून अमृतसरच्या पहिल्या महिला उपायुक्त आहेत.
त्यांनी पंजाबमधील पूरपरिस्थितीत थेट लोकांमध्ये जाऊन मदतकार्य केले आणि विश्वास संपादन केला.
माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत त्यांना ‘आशेचा किरण’ म्हटले.
Sakshi Sawhney biography and achievements as IAS officer in Punjab : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या पूरजन्य परिस्थिती ओढावली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाबमध्येही पुरामुळे लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत साक्षी साहनी नामक तरुणी आशेचा किरण बनून आल्या आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही सोशल मीडियावर साक्षी साहनी यांचे कौतुक केले आहे...