

Who is Krish Bhagat
esakal
Krish Bhagat replacement player to IPL debut story: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. रोहित शर्मा आजच्या सामन्याला मुकला आहे आणि रायन रिकेल्टनचेही नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसत नाही. अशात कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) नाणेफेक करताना दोन युवा खेळाडूंची नावं घेतली... दानिश मालेवार व क्रिश भगत हे दोन खेळाडू मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत आहेत. विदर्भचा दानिश पदार्पणात सलामीला आला, परंतु फार कमाल करता आली नाही. आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते क्रिश भगत याच्याकडे...