
Mitch Owen has just brought up a BBL century off 39 balls : बिग बॅश लीगच्या फायनलमध्ये सिडनी थंडर्स विरुद्ध हॉबर्ट हरिकेन्स यांच्यात चुरशीचा मुकाबला पाहायला मिळतोय. David Warner च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सिडनीने ७ बाद १८२ धावांचा डोंगर उभा केल्या आणि प्रत्युत्तरात २३ वर्षीय मिचेल ओवेनचे वादळ घोंगावले. त्याने ३९ चेंडूंत शतक झळकावले आणि BBL Final मधील हे संयुक्तपणे वेगवान शतक ठरले.