

Mohit Ulva | U19 Asia Cup | Team India
Sakal
U19 Asia Cup 2026, India vs Pakistan Final: भारताच्या युवा संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करत १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या युवा संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला.
भारताच्या विजयात मोहित उल्वाने (Mohit Ulva) मोलाचा वाटा उचलला. त्याने शेवटी दिलेल्या झुंजीमुळे भारतासाठी विजय शक्य झाला. भारताने अंतिम सामन्यात ३३८ धावांचे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर ९ विकेट्स गमावत पूर्ण केले.