

U19 Asia Cup Team India
Sakal
U19 Asia Cup 2026, India vs Pakistan Final : १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या युवा संघाने जिंकले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा १ विकेटने पराभव केला.
यासोबतच गेल्यावर्षीच्या अंतिम सामन्यात झालेल्या आणि यावर्षीच्या साखळी सामन्यातील पराभवाचीही परतफेड केली. आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांच्या अर्धशतकानंतर मोहित उल्वाने शेवटी स्फोटक खेळ करत भारताला विजयापर्यंत पोहचवले.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ५० षटकात ९ विकेट्स गमावत पूर्ण केला. मोहित उल्वाने विजयी चौकार मारला.