मुंबई इंडियन्सकडून पहिली संधी, मग बंदी अन् आता RCB साठी ठरला हिरो, कोण आहे Rasikh Salam Dar?

Who is Rasikh Salam Dar? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४ विकेट्स घेत रसिक सलिम दारने विजयात मोलाचा वाटा उचलला. जम्मू काश्मीरचा असलेल्या रसिकच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या.
Rasikh Salam Dar | RCB

Rasikh Salam Dar | RCB

Sakal

Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी (१५ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले आणि आयपीएल २०२६ मधील चौथ्या विजयाची नोंद केली. बंगळुरूचा हा ५ सामन्यांचील चौथा विजय होता. त्यामुळे बंगळुरूने (RCB) ८ गुणांसह पाँइंट्स टेबलमध्येही पहिला क्रमांक मिळवला आहे.

या विजयात २६ वर्षांच्या रसिख सलाम दारने (Rasikh Salam Dar) मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात लखनौच्या महत्त्वाच्या विकेट्स घेत त्यांना मोठ्या धावा करण्यापासून रोखले.

मध्यमगती गोलंदाज असलेल्या रसिक सलामने एडेन मार्करम, आयुष बडोनी, मुकूल चौधरी या धोकादायक फलंदाजांना बाद करताना ४ षटकात केवळ २४धावा देताना एकूण ४ विकेट्स घेतल्या. यानंतर लखनौच्या संघाला २० षटकात १० बाद १४६ धावा करता आल्या. १४७ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १५.१ षटकातच ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.

<div class="paragraphs"><p>Rasikh Salam Dar | RCB </p></div>
RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com