Vaibhav Suryavanshi dismissal IND vs USA U19
ESAKAL
Vaibhav Suryavanshi dismissal IND vs USA U19: भारताचा युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी याला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अपयश आले. अमेरिकेच्या १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या वैभवला तिसऱ्याच षटकात तंबूत परतावे लागले. सामना झटपट संपवण्याच्या प्रयत्नात वैभव तिन्ही स्टम्प मोकळे सोडून फटका मारायला गेला अन् रित्विक अप्पीडीच्या ( Ritvik Appidi) भन्नाट गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. वैभवची विकेट मिळाल्याचा रित्विकला एवढा आनंद झाला की त्याच्या तोंडून शिव्या निघाल्याचे पाहायला मिळाले