
गेल्यावर्षाच्या अखेरीस बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले होते. ते आयसीसी सर्वात युवा अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय आयसीसीच्या प्रशासनात आले आहेत. त्यांचे नाव संजोग गुप्ता आहेत.
संजोग गुप्ता यांची सोमवारी (७ जुलै) आयसीसी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेव्हा हा पदभार स्वीकारतील तेव्हा ते आयसीसीचे सातवे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरतील.