Simon Harmer breaks 130-year-old world record in Test cricket
South Africa spinner Simon Harmer creates history against Bangladesh: दक्षिण आफ्रिकने जोहान्सबर्ग कसोटीत बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. गतविजेत्या आफ्रिकेने पहिली कसोटी ९ विकेट्स राखून जिंकली आणि या सामन्यात फिरकीपटू सायमन हार्मर चमकला. मागच्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिका कसोटी संघात पुनरागमन केले आणि त्यानंतर तो सातत्याने दमदार कामगिरी करतोय. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात हार्मरने सहा विकेट्स घेतल्या आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त केला. त्याने या कसोटीत एकूण ९ बळी टिपले.